Genesis 43:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तुम्ही बन्यामीनाला पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास जाणार नाही. तुमच्या धाकटया भावाशिवाय तुम्ही परत मागे येऊ नका असे त्या आधिकाऱ्याने आम्हास बजावून सांगितले आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसलात, तर आम्ही जाणार नाही; कारण त्या मनुष्याने आम्हांला सांगितले आहे की तुमच्या भावाला तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हांला पाहता येणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुम्ही त्याला पाठवित नसाल तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला म्हटले, ‘जर तुम्ही तुमच्या भावास सोबत आणले नाही तर तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुम्ही त्यास पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास खाली जाणार नाही. तुमच्या धाकट्या भावाशिवाय तुम्ही माझे तोंड पाहणार नाही असे त्या आधिकाऱ्याने आम्हांला बजावून सांगितले आहे.”