Genesis 43:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग यहुदा आपल्या बापाला म्हणाला, “बाबा बन्यामीनाला माझ्याबरोबर पाठवा. मी त्याची सगळी काळजी घेईन, कारण आम्हाला धान्य आणावयास मिसराला गेलेच पाहिजे; नाही तर आपण सर्व आपल्या मुलाबाळांसकट मरुन जाऊ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा आपला पिता इस्राएल ह्याला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ; अशाने आम्ही, तुम्ही आणि आमची मुलेबाळे वाचतील, मरणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहूदाह आपला पिता इस्राएलला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, आम्ही लगेच जाऊ, म्हणजे तुम्ही, आम्ही व आमची मुले जगणार आणि मरणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यहूदा आपला बाप इस्राएल याला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा. म्हणजे आम्ही जाऊ. मग आपण म्हणजे आम्ही, तुम्ही व आपली मुलेबाळे जिवंत राहू, मरणार नाही.