Genesis 44:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदा म्हणाला, “महाराज! आम्ही आता काहीच बोलू शकत नाही, व याचा उलगडा करण्याचा दुसरा मार्ग नाही. आम्ही अपराधी नाही हे पटविण्यास दुसरा कोणताच मार्ग नाही. आमच्या दुसऱ्या कोणत्यातरी अपराधाबद्दल देवाने आम्हाला दोषी ठरवले आहे. म्हणून आता बन्यामीनासकट आम्ही सर्वजण महाराजांचे गुलाम झालो आहोत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा म्हणाला, “आम्ही स्वामींपुढे काय बोलावे? आम्ही काय सांगावे? आमच्यावरचा हा आरोप दूर कसा करावा? आपल्या दासांचा गुन्हा देवाने पकडला आहे; तर आता आम्ही आणि ज्याच्याजवळ प्याला सापडला तो, असे सर्व स्वामींचे दास झालो आहोत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहने उत्तर दिले, “आमच्या स्वामीपुढे आम्ही काय बोलावे? आमची निर्दोषता आम्ही कशी सिद्ध करावी? परमेश्वराने तुमच्या दासांचे अपराध उघडे केले आहे. महाराज, आम्ही सर्वजण आणि ज्याच्या पोत्यात प्याला सापडला तो देखील तुमचे गुलाम आहोत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा म्हणाला, “माझ्या धन्याला आम्ही काय बोलावे? किंवा आम्ही अपराधी नाही हे कसे सिद्ध करावे? देवाला तुमच्या सेवकांचा दोष सापडला आहे. म्हणून आता त्याच्यासह आम्ही सर्वजण धन्याचे गुलाम झालो आहोत.”