Genesis 44:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहूदा जवळ जाऊन म्हणाला, “स्वामी, कृपा करून आपल्या दासाला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची परवानगी मिळावी; आपला राग आपल्या दासावर भडकू नये; आपण तर फारोसमान आहात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहूदाह पुढे सरसावून म्हणाला, “महाराज, तुमच्या सेवकाला क्षमा करा, मला एक शब्द बोलू द्या, क्षणभर माझे ऐकून घ्या. कृपया, आपल्या सेवकावर रागावू नका, कारण तुम्ही प्रत्यक्ष फारोहसमान आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यहूदा योसेफाजवळ जाऊन म्हणाला, “माझे धनी, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला कानात बोलू द्या आणि माझ्यावर राग भडकू देऊ नका. आपण फारो राजासमान आहात.