Genesis 44:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि आम्ही आपणास उत्तर दिले, ‘होय! आमचा बाप आहे, परंतु तो आता फार म्हातारा झाला आहे; तसेच आम्हाला एक धाकटा भाऊही आहे. आमच्या बापाच्या म्हातारपणी हा आमचा भाऊ जन्मला म्हणून आमच्या बापाचा त्याच्यावर फार जीव आहे; आणि त्याचा तरुण भाऊ मरण पावला; तेव्हा त्या दोघांच्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे; आणि म्हणूनच तो आमच्या बापाचा फार प्रिय व लाडका मुलगा आहे.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा आम्ही स्वामींना सांगितले की आमचा म्हातारा बाप आहे आणि त्याला म्हातारपणी झालेले एक मूल आहे; त्याचा भाऊ मरून गेला आहे, त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे, आणि त्याच्या बापाचे त्याच्यावर प्रेम आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आम्ही आमच्या प्रभूला उत्तर दिले की, ‘आम्हाला वृद्ध वडील आहेत आणि अशा वृद्धापकाळातच त्यांना एक पुत्र झाला. त्याचा भाऊ मरण पावला आहे आणि त्याच्या आईला झालेल्या पुत्रांपैकी तो एकटाच उरलेला आहे आणि त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रीती करतात.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आम्ही आपल्या धन्याला म्हणालो, होय, आमचा बाप आहे, तो म्हातारा आहे तसेच वडिलाच्या म्हातारपणी झालेला लहान भाऊ आहे. आणि त्याचा भाऊ मरण पावला आहे. त्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे. आणि त्याचा बाप त्याच्यावर प्रीती करतो.