Genesis 44:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आमचा धाकटा भाऊ आमच्या बरोबर नाही असे पाहून आमचा बाप नक्की मरुन जाईल; आणि आपल्या बापाला भयंकर दु:ख देऊन त्याच्या मरणास आम्ही कारण झालो हा दोष सतत आमच्या माथ्यावर राहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडील; अशाने आपल्या ह्या दासांमुळे आपला दास, आमचा बाप, ह्याला दु:खी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरवले असे होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मुलगा आमच्याबरोबर नाही असे जर त्यांनी पाहिले तर ते प्राण सोडतील आणि त्यांच्या पिकलेल्या केसांना दुःखात व कबरेत लोटण्यास आम्ही कारणीभूत होऊ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे होईल की, मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल. आणि तुमचा चाकर, आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला तुझे सेवक कारण होतील.