Genesis 44:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मागे आमच्या पोत्यात मिळालेले पैसे आम्ही आता येताना आठवणीने आणले; तेव्हा खात्रीने आपल्या स्वामीच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी चोरणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, जो पैसा आमच्या गोण्यांच्या तोंडी सापडला तोदेखील कनानाहून परत आणून आपल्याला दिला, तर आपल्या स्वामींच्या घरातले सोनेरुपे आम्ही चोरणार कसे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, मागे आमच्या गोणीत मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार?