Genesis 45:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग फारो म्हणाला, “आपल्या गाड्यांपैकी सर्वात चांगल्या गाड्या तुझ्या भावांना दे व त्यांना सांग की कनान देशास जाऊन तुमचे वडील आणि तुमच्या स्त्रिया व मुले या सर्वांना गाड्यात बसवून मागे घेऊन या;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता तुला माझी आज्ञा आहे की, तुम्ही एवढे करा: आपल्या बायकामुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापालाही घेऊन या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणि तुझ्या भावांना असेही सांग, ‘तुमच्या स्त्रिया, मुले आणि तुमचे वडील यांना घेऊन येण्यासाठी इजिप्तमधून गाड्या घेऊन जा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला माझी आज्ञा आहे, तू त्यांना सांग की, ‘असे करा, तुमच्या स्त्रिया व तुमची मुले या सर्वांकरिता मिसर देशातून गाड्या घेऊन जा. तुमच्या वडिलांना घेऊन या.