Genesis 45:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योसेफ म्हणाला, “तर आता तोबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा; माझ्या बापाला सांगा की तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हाला येणे प्रमाणे संदेश पाठवला आहे.” देवाने मला अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे अधिपति केले आहे. तर आता वेळ न दवडता माझ्याकडे निघून या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की, देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे तर माझ्याकडे निघून या, विलंब करू नका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता त्वरा करा आणि माझ्या वडिलांकडे जाऊन त्यांना सांगा की, तुमचा पुत्र योसेफ असे म्हणतो: ‘परमेश्वराने मला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले आहे, म्हणून आता क्षणाचाही विलंब न लावता माझ्याकडे येथे या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योसेफ म्हणाला, “तर आता ताबडतोब माझ्या बापाकडे जाण्यास निघा. त्यास सांगा की, तुमचा मुलगा योसेफ याने तुम्हास संदेश पाठवला आहे. देवाने मला अवघ्या मिसर देशाचा धनी केले आहे. तर माझ्याकडे खाली निघून या. उशीर करू नका.