Genesis 46:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल ह्याला भेटायला गोशेन प्रांतास गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योसेफास आपला रथ तयार करून आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्यास सामोरा गेला. योसेफाने आपल्या पित्यास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यात गळा घालून तो बराच वेळ रडला.