Genesis 47:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योसेफाने फारोचे म्हणणे मानले व त्याने आपल्या बापाला व भावांना मिसरमधील सर्वात उत्तम भूमीचा रामसेस नगरजवळील प्रांत त्यांना राहावयास दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ ह्यांच्या राहण्याची व्यवस्था केली; त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागात म्हणजे रामसेस प्रांतात त्यांना वतन करून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रमाणे योसेफाने आपले वडील आणि भाऊ यांना फारोहच्या आज्ञेप्रमाणे इजिप्तमधील रामसेस नगरामधील सर्वोत्तम जागा वतन म्हणून दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना रहावयास दिली.