Genesis 47:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले. त्यांच्या जवळचे सर्व पैसे अन्नधान्य विकत घेण्यात खर्च झाल्यामुळे त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिले नाही. त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! कृपा करुन आम्हाला धान्य द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत; आम्हाला जर काही खावयास मिळाले नाही तर तुमच्या डोळ्यादेखत आम्ही मरुन जाऊ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिसर देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही, तेव्हा सर्व मिसरी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हांला अन्न द्या. आपल्यादेखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा सर्व पैसा संपला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?”