Genesis 47:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दिवस वाढत गेले तसे इस्राएलाने (याकोबाने) जाणले की आता आपण लवकर मरणार, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले; तो म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडिखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. जेव्हा मी मरेन तेव्हा मला मिसरमध्ये पुरु नको;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या मरणाचा काळ जवळ आला, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले आणि तो त्यास म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडीखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की, मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. मला मिसरामध्ये पुरू नको.