Genesis 47:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात आमच्या कळपासाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा नाही म्हणून आम्ही ह्या देशात राहण्यास आलो आहोत; महाराज आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आम्हास कृपा करुन गोशेन प्रांतात राहू द्यावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते फारोला आणखी म्हणाले, “आम्ही ह्या देशात काही दिवस राहायला आलो आहोत. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेरडामेंढरांना चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासांना गोशेन प्रांतात राहू द्यावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते फारोहला आणखी म्हणाले, “आम्ही इथे काही काळ राहण्यास आलो आहोत, कारण कनान देशात अतितीव्र दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या सेवकांच्या गुरांसाठी तिथे चारा नाही. तुम्ही आम्हाला गोशेन प्रांतात राहू द्यावे अशी विनंती आम्ही करीत आहोत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात तुमच्या दासांच्या कळपांसाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा राहिलेला नाही म्हणून आम्ही या देशात तात्पुरते राहण्यास आलो आहोत. आम्ही आपणांस विनंती करतो की आम्हास गोशेन प्रांतात राहू द्यावे.”