Genesis 47:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
9याकोबाने उत्तर दिले, “मला फक्त थोडे परंतु कठिण आणि दु:खी असे जीवन लभले आहे व ते मला त्रासदायक व दु:खदायक असे झाले; मला फक्त 130 वर्षांचे आयुष्य मिळाले परंतु माझे पूर्वज माझ्यापेक्षा अधिक वर्षांच जीवन जगले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोब फारोला म्हणाला, “माझी जीवितयात्रा एकशे तीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोचले नाहीत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, “माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाने फारोस उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.”