Genesis 48:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु त्याचा बाप आपले म्हणणे कायम ठेवत पुढे म्हणाला, “माझ्या मुला! मला माहीत आहे; होय मला माहित आहे की मनश्शे हा प्रथम जन्मलेला आहे; आणि तो महान होईल; तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल म्हणजे त्याच्यापासून अनेक राष्ट्रे उदयास येतील, परंतु धाकटा भाऊ थोरल्या पेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे म्हणणे नाकारून त्याचा बाप म्हणाला, “मुला, ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे; त्याचेही एक राष्ट्र होईल आणि तोही महान होईल. तथापि त्याचा धाकटा भाऊ त्याच्यापेक्षा मोठा होईल आणि त्याच्या वंशजांतून राष्ट्रांचा समुदाय निर्माण होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्याच्या वडिलांनी ते नाकारले आणि ते म्हणाले, “मला माहीत आहे, माझ्या मुला, मला माहीत आहे. त्याचीही कुळे होतील आणि तो देखील महान होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्याच्याहीपेक्षा थोर होईल आणि त्याचे लोक राष्ट्रांचे समुदाय बनतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्याचा वडिलाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”