Genesis 48:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या भावांना मी जे दिले नाही ते मी तुला देतो; मी स्वत: तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला पर्वत तुला देतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला तुझ्या भावांच्यापेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तलवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि मी तुझ्या भावांपेक्षा तुला जमिनीचा एक भाग अधिक देतो, तो मी, माझी तलवार आणि माझे धनुष्य यांच्या बळावर, अमोरी लोकांपासून जिंकून घेतला होता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”