Genesis 48:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण पदन - अराम येथून येताना तुझी आई राहेल एफ्राथजवळ आम्ही, वाटचाल करीत असताना कनान देशात मरण पावली; त्यामुळे मी फार दु:खी झालो; तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला मूठमाती दिली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पदन येथून येत असता एफ्राथ गाव काहीसा दूर राहिला तेव्हा कनान देशात वाटेतच राहेल माझ्याजवळ मरण पावली. एफ्राथ म्हणजे बेथलेहेमच्या वाटेवर तिला पुरले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पद्दन-अराम येथून परत येत होतो आणि कनान देशात एफ्राथपासून थोड्याच अंतरावर होतो, तेव्हा राहेलच्या मृत्यूचे दुःख माझ्यावर पडले आणि मी तिला एफ्राथ गावाच्या थोड्या अंतरावर पुरले” (म्हणजे बेथलेहेम).
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.”