Genesis 49:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या आईबापाच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडल्या व अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या; आणि मी तुझा बाप, मला त्यांच्यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळाला; तुझ्या भावांनी तुला काही ठेवले नाही. परंतु माझे सर्व आशीर्वाद तुझ्यावर पर्वता एवढे होतील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वतांच्या वरदानांहून श्रेष्ठ आहेत; ती सनातन डोंगरांपासून प्राप्त होणार्या इष्ट वस्तूंहून श्रेष्ठ आहेत; हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, आपल्या भाऊबंदांत जो प्रमुख त्याच्या शिरी येवोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील, अथवा सर्वकाळ टिकून राहणाऱ्या डोंगरांपासून प्राप्त होणाऱ्या इच्छित वस्तुंहून श्रेष्ठ होतील. ते योसेफाच्या मस्तकावर, जो आपल्या भावांमध्ये राजपुत्र त्याच्या मस्तकावर आशीर्वाद असे राहतील.