Genesis 49:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती गुहा कनान देशात मम्रेच्या राईजवळील मकपेला येथील शेतात आहे. आपल्या घराण्याला कबरस्तान असावे म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रामकडून विकत घेतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कनान देशातील मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहा जी अब्राहामाने शेतासह एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून विकत घेतली होती तीच ही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कनान देशात अब्राहामाने एफ्रोन हेथीपासून विकत घेतलेली स्मशानभूमी मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेमध्ये आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.