Genesis 49:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी गुपचूप वाईट गोष्टी करण्याचे ठरवले; त्यांचे हे बेत माझ्या जीवाला मान्य नाहीत; तसेच त्यांच्या गुप्त बैठका मला मान्य नाहीत; त्यांनी रागाच्या भरात माणसांची कत्तल केली; गंमत म्हणून त्यांनी पशूंना जखमी केले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या जिवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको; माझ्या शीला, त्यांच्या मंडळात सामील होऊ नको; कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला; त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये, त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये, कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला, आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको; त्यांच्या गुप्त बैठकांमध्ये सामील होऊ नको, त्यांचे हे बेत माझ्या जिवाला मान्य नाहीत. त्यांनी त्यांच्या रागाच्या भरात पुरुषांची कत्तल केली. आपल्या रागाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.