Genesis 49:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस; माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस; यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहे आणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाह, तू सिंहाचा छावा आहेस. माझ्या मुला, तू तुझ्या शिकारीहून परत येतो. सिंहासारखा दबा धरून बसतो व विसावा घेतो, सिंहिणीप्रमाणे आहेस—त्याला कोण छेडणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा सिंहाचा छावा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे, तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याचे धाडस कोण करील?