Genesis 50:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले. फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरुन आता सुद्धा आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वत:शीच म्हणाले कदाचित “योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा योसेफाच्या भावांनी पाहिले की त्यांचे वडील मरण पावले, ते म्हणाले, “आपण योसेफाला जी वाईट वागणूक दिली होती, त्याची जर त्याने वाईटाने आपल्याला परतफेड केली तर?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले, फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशीच म्हणाले, “कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल.”