Genesis 7:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा रीतीने देवाने पृथ्वीच्या पाठीवरील सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश केला; जे वाचले ते म्हणजे नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवात त्याच्या सोबत असलेले प्राणी, फक्त एवढेच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्वकाही म्हणजे मानव, पशू, रांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी ह्या सर्वांचा नाश देवाने केला; ते पृथ्वीवरून नाहीसे झाले; नोहा व त्याच्याबरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजिवांचा नाश झाला; मानव आणि प्राणी आणि सरपटणारे प्राणी आणि पक्षी पृथ्वीवरून नाहीसे झाले. फक्त नोआह आणि त्याच्यासोबत तारवात असलेलेच वाचले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले.