Habakkuk 1:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर हबक्कूक म्हणाला, “परमेश्वरा, तू सनातन परमेश्वर आहेस तू माझा कधीही न मरणारा पवित्र, देव आहेस परमेश्वरा, जे केलेच पाहिजे, ते करण्यासाठीच तू खास्द्यांना निर्मिले आहेस आमच्या खडका, यहूद्यांच्या लोकांना शिक्षा करण्यासाठी तू त्यांना निर्मिले आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही.1 हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्याला स्थापले आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्रा, तू प्राचीनकाळापासून नाहीस काय? आम्ही मरणार नाही. परमेश्वरा तू त्यांना न्यायासाठी नेमले आहे, आणि हे खडका तू त्यांना शासन करण्यासाठीच स्थापिले आहे.