Habakkuk 1:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांचे घोडे चित्यांपेक्षा चपळ आणि सूर्यास्ताच्या वेळच्या लांडग्यांपेक्षा वाईट वृत्तीचे असतील. त्यांचे घोडेस्वार दूरदूरच्या ठिकाणाहून येतील. भुकेला गरुड ज्याप्रमाणे आकाशातून एकदम झडप घालतो, त्याप्राणेच ते शत्रूंवर हल्ला करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्या गरुडासारखे ते धावतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात, आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात.