Habakkuk 2:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण लवकरच तो सर्व लोकांच्या चेष्टेचा विषय होईल. ते त्याच्या पराभवाच्या कथा सांगतील. ते हसून म्हणतील, ‘फारच वाईट झाले बुवा! त्या माणसाने खूप गोष्टी चोरल्या. त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टी त्याने उचलल्या. पण त्यांचेच आता त्याला ओझे होईल. त्याने कर्ज काढून स्वत:ला श्रीमंत बनवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सर्व त्याला कवन, कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील. जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील?