Habakkuk 3:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू, तुझ्या माणसांच्या, रक्षणासाठी आलास. तू निवडलेल्या राजाला, विजयकाडे नेण्यासाठी आलास. रंकापासून रावापर्यंतच्या, प्रत्येक दुष्ट घरातील प्रमुखाला तू ठार मारलेस. सेला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करतोस. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात. तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला!