Haggai 1:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणतो, “मी भूमीला आणि पर्वतांना रुक्ष होण्याची आज्ञा दिली आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आणि धान्य, नवीन मद्य, जैतुनाचे तेल ह्यांची नासाडी होईल. सर्व लोक आणि सर्व प्राणी दुर्बल होतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी देशावर अवर्षण बोलावले आहे; पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मी भूमीवर आणि पर्वतांवर, धान्यावर नव्या द्राक्षरसावर व तेलावर आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशूवर व तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे.”