Haggai 2:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“समजा एखादा माणूस वस्त्रांमधून मांस नेतो. ते मांस परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आहे म्हणून ते पवित्र आहे. पण ज्या वस्त्रांत ते गुंडाळले आहे, त्या वस्त्राचा स्पर्श भाकरी, किंवा शिजविलेले अन्न, मद्य, तेल किंवा इतर अन्नाला झाला, तर ह्या स्पर्श झालेल्या सर्व वस्तू पवित्र होतील का?” याजक उत्तरले, “नाही”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘कोणी समर्पित मांस आपल्या वस्त्राच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला, कालवणाला, द्राक्षारसाला, तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला, तर ते पवित्र होईल काय?”’ तेव्हा याजकांनी “नाही” असे उत्तर दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्यापैकी कोणी आपल्या झग्यामध्ये पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्यावेळी त्याच्या झग्याचा स्पर्श भाकर, द्राक्षारस अथवा मांस यांना झाला, तर स्पर्श झालेला पदार्थ पवित्र होईल काय?’ ” त्यावर याजकांनी उत्तर दिले, “नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर कोणी आपल्या वस्त्राच्या पदरातून समर्पित मांस नेतो. त्याच्या पदराने भाकरीला, किंवा कालवणाला, द्रक्षरस किंवा तेल, किंवा इतर अन्नाला स्पर्श झाला, तर या सर्व वस्तू पवित्र होतील का? याजकांनी उत्तर दिले, “नाही.”