Haggai 2:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग हाग्गयने विचारले, “एखाद्याने प्रेताला स्पर्श केला, तर तो अशुध्द होतो, ह्या माणसाने दुसऱ्या कोणत्या गोष्टीला स्पर्श केला, तर ती गोष्टसुध्दा अशुध्द होईल का?” याजक म्हणाले, “हो! ती गोष्टसुध्दा अशुध्दच होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग हाग्गय म्हणाला, “प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला ह्यांपैकी कशासही शिवला, तर ते अशुद्ध होईल ना?” तेव्हा याजकांनी “होईल” असे उत्तर दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग हाग्गय म्हणाला, “जर प्रेताला स्पर्श केल्यामुळे, कोणी अशुद्ध झालेला यापैकी कशासही स्पर्श केला, तर ते अशुद्ध होईल का?” याजक म्हणाले, “हो! तेसुध्दा अशुद्ध होईल.”