Haggai 2:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी पुष्कळ राजे आणि राज्ये उलथवून टाकीन. त्या दुसऱ्या लोकांच्या राज्यसत्तेचा मी नाश करीन. मी त्यांच्या रथांचा व सारथ्यांचा नाश करीन. आता त्या सैन्यांमध्ये मैत्री आहे. पण ते एकमेकांविरुध्द उठातील आणि तलवारीने एकमेकांना मारतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन; रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यांवरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व राष्ट्रांमधील राजासने उलथून टाकेन व परकियांचे सामर्थ्य डळमळीत करणार आहे. मी त्यांचे रथ व त्यांचे सारथी उलथून टाकेन; घोडे व त्यावरील स्वार पडतील, प्रत्येकजण त्याच्या भावाच्या तलवारीने पडेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी राज्यांचे सिंहासन उलथवून टाकीन आणि राष्ट्रांचे बळ नष्ट करीन! मी त्यांच्या रथांना व सारथ्यांना उलथून टाकीन. त्यांचे घोडे व सारथी खाली पडतील, कारण प्रत्येकजण आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.