Haggai 2:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे शल्तीएलच्या मुला, जरुब्बाबेल, तू माझा सेवक आहेस मी तुझी निवड केली आहे, आणि त्यावेळी मी तुझा मुद्रांकित अंगठीप्रमाणे उपयोग करीन. मी ह्या गोष्टी केल्या आहेत ह्याचा तू साक्षी वा पुरावा असशील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेनाधीश परमेश्वर म्हणतो: त्या दिवशी, हे जरूब्बाबेला, शल्तीएलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी तुला निवडले आहे,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्यादिवशी हे शल्तीएलाच्या मुला, जरुब्बाबेला, माझ्या सेवकाप्रमाणे मी तुला घेईन, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला मुद्रांकित अंगठीप्रमाणे करीन, कारण मी तुला निवडले आहे! असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.