Haggai 2:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ज्याने ह्या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हांला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“या भवनाची पूर्वीची भव्यता कशी होती हे सांगण्यास तुमच्यातील कोणी उरले आहे काय? हे सध्याचे काहीच नाही असे तुम्हाला वाटते ना?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याने हे मंदिर त्याच्या पहिल्या वैभवात पाहिले, असा कोण तुम्हामध्ये उरला आहे? आणि आता तुम्हास हे कसे दिसते? हे तुमच्या नजरेत काहीच नसल्यासारखे नाही काय?