Hebrews 10:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पापे दूर करायला जे यज्ञ कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ प्रत्येक यहुदी याजक प्रतिदिवशी सेवा करीत वारंवार अर्पण करीत उभा असतो;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.