Hebrews 10:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते समर्थ असते, तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापांची जाणीव नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर नियमशास्त्र लोकांस परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते.