Hebrews 10:34 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली स्वर्गीय मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे जाणून तुम्ही आपल्या ऐहिक मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंदिवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही स्वतःच्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.