Hebrews 10:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पहिल्याने तो म्हणाला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी व पापार्पणांनी संतोष वाटत नाही.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात रतीदेखील.)
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
वर उल्लेखिल्याप्रमाणे तो प्रथम म्हणाला, ‘यज्ञ, अर्पणे, होमार्पणे व पापांबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष होत नव्हता’; (नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण करण्यात येतात ती ही);
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष नव्हता” (ती नियम-शास्त्राप्रमाणे अर्पण करण्यात येतात);
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते प्रथम म्हणाले, “बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;” जरी ते नियमानुसार अर्पण करत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होमार्पणे व पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यामध्ये तुला संतोष नव्हता.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.)