Hebrews 11:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
याकोबने मरते वेळेस योसेफच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाची आराधना केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोबानेही, तो वृद्ध झालेला व मृत्युशय्येवर असतानाही उठून व आपल्या काठीच्या टोकावर टेकून त्याने उपासना केली व विश्वासाने प्रार्थना करून योसेफाच्या दोन्ही मुलांना आशीर्वाद दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने, आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले.