Hebrews 11:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
विश्वासाने तो वचनदत्त देशात एखाद्या उपऱ्यासारखा राहिला. इसहाक व याकोब यांच्यासारखा तोदेखील तंबूत राहिला. कारण ते दोघेही अब्राहामाला दिलेल्या त्याच वचनाचे वारसदार होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला; त्याच वचनाचे सहभागी वारस म्हणून इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्यांची वसती होती;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्‍यात वस्ती होती.