Hebrews 12:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यानी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्या इंद्रियगोचर गोष्टींकडे इस्राएली लोक आले होते, ह्याकडे तुम्ही आला नाहीत. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की, देवाचे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाहीत; तो ध्वनी ऐकणार्यांनी विनंती केली की, त्याच्या योगे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यांनी ऐकला, देवाकडे त्यांनी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.