Hebrews 12:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिवाय शिक्षा करणाऱ्या आपल्या मानवी पित्याचा आपण आदर राखतो, तर मग आपण जो आत्म्याचा पिता आहे, त्याच्या अधिक प्रमाणात अधीन होऊन जिवंत राहू नये काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हास शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?