Hebrews 13:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे, हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, दुःखी मनाने नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या पुढार्‍यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशोब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.