Hebrews 2:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्याने सर्व काही निर्माण केले व जो सर्व काही अस्तित्वात टिकवून ठेवतो त्या परमेश्वराने पुष्कळ पुत्रांना त्याच्या वैभवात सहभागी करून घेताना त्यांच्या तारणाचा अग्रेसर येशूला दुःखसहनाच्याद्वारे परिपूर्ण केले, हे देवाच्या दृष्टीने उचितच झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, व ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे योग्य होते की परमेश्वर, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले, त्यांनी पुष्कळ पुत्रांना व कन्यांना गौरवात आणावे, यासाठी की त्यांच्या तारणाच्या उत्पादकाच्या दुःख सहनाद्वारे त्यांना परिपूर्ण करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.