Hebrews 4:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्याअर्थी देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या विसाव्याविषयी देव बोलला, त्याच्याविषयीचे अभिवचन त्याने आपल्याला देऊन ठेवलेले आहे; कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण काळजी घेऊ या;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे; ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यास्तव, ज्याअर्थी त्यांच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी देवापासून मिळालेले अभिवचन अजूनही आहे आणि यास्तव तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.