Hebrews 4:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या आम्ही विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. जसे देवाने म्हटले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत’” स्तोत्र. 95:11 जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र आपण श्रद्धावंत लोक परमेश्वराने वचन दिलेल्या विसाव्यात प्रवेश करीत आहोत. हे त्याच्या शब्दाप्रमाणेच घडत आहे: मी माझ्या क्रोधाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. जरी जगाच्या निर्मितीनंतर त्याचे कार्य पूर्ण झाले होते, तरीही तो हे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याची ‘कृत्ये’ जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली. तथापि, “त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत;”’ असे ज्या ‘विसाव्याविषयी,’ त्याने सांगितलेले आहे त्यात, ज्या आपण विश्वास ठेवला आहे ते ‘आपण प्रवेश करत आहोत.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले, “मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहेत व त्यांची वाट पाहत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या आपण विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. असे देवाने म्हणले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत” जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.