Hebrews 4:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्र्च्ति केली असून त्याला तो “आज” असे म्हणतो, अगोदरच उदधृत केलेल्या उताऱ्यामध्ये म्हटल्याप्रमाणे देव त्या दिवसाविषयी पुष्कळ वर्षांनी दाविदाद्वारे बोलला: “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंत:करणे कठीण करु नका.”स्तोत्र. 95:7-8
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्याद्वारे म्हणतो, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून तो पुन्हा ‘आज’ हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु विसाव्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने दुसरी वेळ नेमली आहे आणि त्याला “आज” असे म्हटले. हे ते फार पूर्वी दावीदाच्या मुखाद्वारे बोलले होते, आधीच नमूद केलेल्या शब्दांत ते म्हणाले, “आज तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर किती बरे, आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्चित केली असून त्यास तो “आज” हा एक असा दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्या द्वारे असे म्हणतो, “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.”