Hebrews 6:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरिता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने आपली आस्था शेवटपर्यंत टिकवून ठेवावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमची इच्छा आहे की तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत असाच उत्साह दाखवावा, म्हणजे जी आशा तुम्ही बाळगता ती पूर्ण होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.