Hebrews 7:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारख येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मानवी नियम निर्बंधांनी नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा ‘मलकीसदेकासारखा’ निराळा ‘याजक’ जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जे काही आम्ही म्हटले ते अधिक स्पष्ट आहे की मलकीसदेकासारखा दुसरा याजक प्रकट होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हाही गोष्ट आणखी स्पष्ट होते.