Hebrews 7:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण येशू जेव्हा याजक, बनला तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की, “प्रभूने शपथ वाहिली आहे, आणि तो आपले मत बदलणार नाही: ‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’” स्तोत्र. 110:4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
इतर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण येशूविषयी ‘तू युगानुयुगे याजक असशील’, अशी शपथ प्रभूने वाहिली आणि ती तो बदलणार नाही, असे सांगितले. त्याच्या त्या शपथेने येशू हा याजक झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(ते तर शपथेवाचून याजक झालेले आहेत; पण ज्याने त्याच्याविषयी [मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे] “‘तू युगानुयुग याजक आहेस’ अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही,” असे सांगितले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला),
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तो शपथ घेऊन याजक झाला, जेव्हा परमेश्वर त्याला म्हणाले, “प्रभूने शपथ घेतली आहे आणि ते त्यांचे मन कदापि बदलणार नाहीत: ‘तू सदासर्वकाळचा याजक आहेस.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा ते शपथेवाचून याजक झाले आहेत पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्यास सांगितले की, ‘प्रभूने शपथ वाहिली आहे आणि तो आपले मन बदलणार नाही, तू युगानुयुगाचा याजक आहेस.’